Dainik Maval News : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव असल्याने रविवारी (दि.30 मार्च) रोजी होणारा आठवडे बाजार रद्द करण्यात येत असल्याचे पत्रक तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रविवारी (दि.30) गुडीपाडव्याच्या दिवशी सालाबाद प्रमाणे तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असणार आहे. तसेच रविवारी आठवडे बाजार भरविल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. यामुळे सामान्य नागरिकांची, व्यापारी, विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार रोजीचा शहराचा आठवडे बाजार रद्द करण्यात येत आहे, असे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्ध केले आहे.
सहा एप्रिलचा आठवडे बाजार स्थलांतरीत
दरम्यान, पुढील आठवड्यात रविवार (दि.6 एप्रिल) रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी रामनवमी आहे. त्यामुळे, त्यादिवशीचा आठवडे बाजार नेहमीच्या ठिकाणी मुख्य बाजरपेठेत न भरता येथील बॉम्बे वर्कशॉप पासून मोहर प्रतिमा सोसायटीच्या रोडच्या दोन्ही बाजूस आणि थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे (पाटील) शाळेच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावरती भरविण्यात येणार आहे.
सर्व नागरिक, व्यवसायिक, विक्रेते, व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाई यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान