Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे झालेल्या भीषण अपघातात सीआरपीएफ केंद्रातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपी वाहनचालकाने निष्काळजीपणे कार चालवत स्कूटीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्प गेट क्रमांक १ समोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी मृत जवानाचा सहकारी प्रभाकरन एम (वय ४१, रा. सीआरपीएफ कॅम्प, कोयना बॅरेक, तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली असून, तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी सुरज रोहिदास नवघणे (वय २८, रा. ब्राम्हणवाडी, साते, ता. मावळ) यास अटक करण्यात आली आहे.
आरोपीने आपल्या ताब्यातील नेक्सॉन कार (एमएच-१४-जेएम-०३१२) भरधाव वेगात चालवत स्कूटी (एमएच-०५-बीपी-५७२२) ला जोरदार धडक दिली. यात स्कूटीवरील अनमोल विश्वनाथ राय (वय ४१) गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून, पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा !