Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या वतीने स्मृती सतीश मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल क्लासरूम चे लोकार्पण करण्यात आले. क्लासरूम चे उद्घाटन डिस्ट्रिक्ट को डायरेक्टर संदीप मगर व स्मृती मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
नथूभाऊ भेगडे पाटील शाळा क्रमांक दोन येथे सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सीएसआर फंडामधून व अश्विनी डेंटल क्लिनिक याच्या सहकार्याने सक्षम विद्यार्थी या उपक्रमा अंतर्गत डिजिटल क्लास रूमचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर दीपक फल्ले, किरण ओसवाल, सतीश मेहता, प्रतीक मेहता, प्रदीप मुंगसे, निखिल महापात्रा, चेतन पटवा, सुरभी मेहता, सारंग मेहता हे उपस्थित होते. गोल्डन रोटरीच्या वतीने घेत असलेल्या या स्तुत्य उपक्रमास संदीप मगर यांनी शुभेच्छा दिल्या.
गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी मी माझे शिक्षण ज्या शाळेत झाले त्याच शाळेत डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण माझ्या अध्यक्षपदाच्या काळात करण्याचा योग आला हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस. मुख्याध्यापक चिमटे सर यांनी कृतज्ञता व्यक्त करून गोल्डन रोटरीचे आभार मानले.
याप्रसंगी स्मृती मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. धनश्री काळे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण कसे महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले. प्रकल्प प्रमुख डॉ सौरभ मेहता यांनी या प्रकल्पाच्या मागील उद्देश सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेधा शिंदे, दीक्षा वाईकर, महेश कुंभार, बसप्पा भंडारी, दिनेश चिखले, सुरेश भाऊबंदे,राकेश गरुड, डॉ सचिन भसे, हर्षल जव्हेरी यांनी प्रयत्न केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय