व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : निकाली कुस्तीत बाला रफिक शेखने पटाकवली चांदीची गदा, ‘या’ बैलजोडीला ‘घाटाचा राजा’ मान

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 14, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Bail Gada Sharyat

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिक उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीसह, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि निकाली कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या कुस्तीच्या आखाड्यात ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफिक शेख आणि पंजाबचा मल्ल यतिंदर या दोन मल्लांमध्ये अखेरची लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत बाला रफिक शेखने यतिंदर यास टांग डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस व चांदीची गदा पटकाविली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यंदा आखाड्यात एकूण सुमारे 7 लाख 50 हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या यावेळी झाल्या. आर्यन दाभाडे, आदित्य भेगडे, आराध्या भेगडे, आस्मी लोणारी या तळेगावातील मल्लांनीही प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. आखाड्यात एकूण 75 लहान-मोठ्या कुस्त्या निकाली झाल्या. पंच म्हणून बाळासाहेब सातकर, बाळतात्या भेगडे, अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, अशोक भेगडे, छबूराव भेगडे, प्रताप भेगडे आदींनी काम पाहिले. हंगेश्वर धायगुडे यांनी कुस्तीचे समालोचन केले. गोरख काकडे यांनी सूत्रसंचालन केले. ( Talegaon Dabhade Dolasnath Maharaj Annual Festival 2024 Wrestling and Bail Gada Competition )

देविदास सावंत, मारुती केंजळे, हर्षवर्धन कदम यांचा गाडा ठरला घाटाचा राजा –
श्री डोळसनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या दिवशी देविदास सावंत, मारुती केंजळे यांच्या तर दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन सुभाष कदम यांच्या बैलजोडीने घाटाचा राजा हा मान मिळविला. गावामधून सोमाभाऊ भेगडे यांच्या गाड्याचा प्रथम क्रमांक आला. घाटाचा राजा बहुमान मिळविणाऱ्या बैलगाड्यांना प्रत्येकी 3 हजार 200 रुपये बक्षीस देण्यात आले. 13 सेकंदामध्ये 51 गाडे धावले. त्यांना प्रत्येकी रोख 1 हजार 900 रुपये बक्षीस दिले. 14 सेकंदामध्ये 77 गाडे धावले. त्यांना प्रत्येकी 600 रुपये बक्षीस दिले. 15 सेकंदामध्ये 37 गाडे धावले. त्यांनाही बक्षीस दिले गेले. या घाटात फळीफोडमध्ये महेंद्र वारिंगे, शिवाजी जांभूळकर, संतोष पिंगळे यांना बक्षिस मिळाले.

अधिक वाचा –
– ‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval
– दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत मावळ भाजपाचा संवाद मेळावा संपन्न; महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन । Maval Lok Sabha
– मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण । Maval Lok Sabha 2024


Previous Post

“भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Blood donation camp

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.