Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व चिखले एक्वा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे शहरातील विसर्जन मिरवणूक मध्ये मोफत पाणी वाटप व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले होते.
निर्माल्य कलश मध्ये टाका तसेच तळेगाव नगरपरिषदेने कृत्रिम हौद केला आहे त्यामध्ये श्री गणेशाच्या मूर्ती विसर्जन करा अन्यथा मूर्ती दान करा व पर्यावरणाला मदत करा. प्लास्टिकचा वापर कमी करा असे आवाहन करण्यात आले होते. त्याला तळेगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तळेगाव शहरातील मानाच्या पाच गणपतीचे स्वागत वृक्ष व पर्यावरण पूरक पिशवी देऊन स्वागत करण्यात आले. गोल्डन रोटीरीच्या वतीने शुद्ध फिल्टर पाण्याची व्यवस्था व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनीही सदिच्छा भेट दिली व गोल्डन रोटरी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष रो संतोष परदेशी,उपाध्यक्ष रो प्रशांत ताये, सचिव रो प्रदीप टेकवडे,क्लब ट्रेनर दीपक फल्ले, रो बसप्पा भंडारी,रो सौरभ मेहता, प्रकल्प प्रमुख रो दिनेश चिखले,रो गौरव क्षीरसागर रो.चेतन पटवा व रो रितेश फाकटकर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
