Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी अर्थात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवार ( दि. 17) पर्यंत एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
अर्जाचा अंतिम दिवस (सोमवार) : एकूण 97 अर्ज दाखल
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी (17 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 97 अर्ज दाखल झाले. त्यात सदस्यपदासाठी 92 आणि अध्यक्षपदासाठी 5 अर्ज दाखल झाले. आजपर्यंतचा एकूण आकडा पाहता 138 अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज भरण्याच्या अखेरीस नगराध्यक्षपदासाठी 5 आणि सदस्यपदासाठी 133 असे एकूण 138 अर्ज दाखल झाले आहेत. अधिकृत, पर्यायी आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली.
अपक्ष उमेदवारांची संख्या जवळपास 100 असून तीच सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले. आज (मंगळवार) सर्व अर्जांची छाननी होणार आहे.
तळेगावात पहिल्यांदाच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती मैदानात उतरली आहे. घड्याळ आणि कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवली जाणार असून, दोन्ही पक्षातील नाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरून थेट लढतीला रंग चढवला आहे.
अंतिम दिवशी दाखल झालेल्या 97 अर्जांनंतर कोण माघार घेणार आणि कोण शेवटपर्यंत मैदानात टिकणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. खरी लढत अर्जमाघारीनंतर (25 नोव्हेंबर) स्पष्ट होईल.
नगराध्यक्षपदाची लढत प्रतिष्ठेची असून युतीचे उमेदवार भाजपाचे संतोष दाभाडे हे प्रमुख दावेदार. त्यांच्यासमोर अपक्ष किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष ऍड. रंजना भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाळुंज आणि अपक्ष सौरभ दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
