Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत बुधवारी (दि. ८ ) सकाळी अकरा वाजता जाहीर झाली. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रभागात थोडी खुशी थोडा गम असा माहौल होता. पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांच्या उपस्थितीमध्ये व सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्यधिकारी ममता राठोड यांच्या उपस्थितीत नगरपरिषद सभागृहात आरक्षण सोडती जाहीर झाल्या.
आरक्षण सोडतीमध्ये प्रथमतः अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट याची सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थी सई शेजवळ,वैष्णवी तागड, उमेजा बासरे, आराध्या भालेकर, नेहा चव्हाण यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर आरक्षणात इतर मागासवर्ग व त्यानंतर सर्वसाधारण गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद : प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे,
प्रभाग क्रमांक १ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक २ – अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक ३ – अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ४ – अ) अनुसूचित जमाती महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ५ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ६ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक ७ – अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ८ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ९ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक १० – अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक ११ – अ) ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक १२ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक १३ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १४ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला ,
सोमवारी जाहीर झालेल्या निर्णयानुसार नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. बुधवारी आरक्षण सोडतीस विविध प्रभागातील प्रमुख इच्छुकांसमवेत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि. ९ रोजी अधिकृत प्रभाग आरक्षण यादी प्रसिद्ध करणार असून दि. १४ पर्यंत आक्षेप व हरकती घेण्यात येतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर

