तळेगाव दाभाडेत डीपी रोडच्या रुंदीकरणामध्ये कायम रहिवासी असणाऱ्या नागरिकांची राहती घरी पाडून त्यांना बेघर करू नका. आधी त्यांना राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी, तसे न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला आहे. ( Talegaon Dabhade Municipal Council Kishor Aware Warning not to demolish houses )
म्हाडाच्या प्रस्तावित रोड साठी अडसर असणाऱ्या तीन घरांना तातडीने पाडण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने दिली होती. तेथील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू किशोर आवरे यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील रहिवाशांना दिलासा मिळवून दिला आहे. आधी लोकांच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करा मगच त्यांची घरे पाडा असे खडसावून किशोर आवारे यांनी नगर प्रशासनाला सांगितले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव शहरात अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत तसेच ग्रीन झोन मध्ये देखील अनेक अनधिकृत बांधकामे होत आहेत. धनाढ्य बिल्डर्स आणि काही राजकीय आश्रय असणाऱ्या धनिकांचे अनधिकृत बांधकाम मुख्याधिकाऱ्यांनी पाडून दाखवावे, मगच गरिबांच्या घरांना हात लावावा. एकही गरीबाचे घर पुनर्वसन झाल्याशिवाय तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा किशोर आवारे यांनी घेतला.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सध्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे, ती करत असताना येथील जोशी वाडी मधील रहिवाशांना रस्ता रुंदीकरणात अडथळा येणारी घरे पाडण्यात येतील, असे वेळोवेळी नोटिसीद्वारे नगरपरिषदेने कळवले होते. त्यामुळे किशोर आवारे यांनी सर्व नागरिकांना घेऊन नगरपरिषदेमध्ये जाऊन नगरपरिषद प्रशासनाला फैलावर घेतले. यावेळी माजी नगरसेवक अरुण माने, रोहित लांघे, सुनील कारंडे, प्रवक्ते मिलिंद, अच्युत कल्पेश भगत, सुनील पवार, अनिल भांगरे आदी मान्यवर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनात उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पैलवान खंडू वाळूंज यांची निवड
– मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval