Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर पथविक्रेता समितीच्या आठ सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणी लाडे यांनी हे जाहीर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शहर फेरीवाला समिती पथ विक्रेत्यांच्या एकूण आठ सदस्यांच्या निवडणुकीकरिता विहित कालावधीत एकूण 9 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एक अर्ज कागदपत्रांअभावी अवैध ठरविण्यात आला. उर्वरित आठ नामनिर्देशन अर्ज वैध ठरविण्यात आले.
नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत सोमवार, दि. 9 सप्टेंबर पर्यंत होती. यावेळी विहित वेळेत प्राप्त अर्जापैकी कुणीही नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाही. तसेच कोणतेही आक्षेप नसल्याने सर्व (आठ) नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :
सर्वसाधारण – दत्तात्रय पंडित भोसले, किरण बबन जव्हेरी,
सर्वसाधारण महिला – सुजाता रवींद्र बैचे,
अनुसूचित जाती-महिला – करुणा प्रकाश सरोदे,
अनुसूचित जमाती – रामदास बबन आगिवले,
इतर मागास वर्ग- निलेश बाळकृष्ण मांजरेकर,
अल्पसंख्याक-महिला – जायादाबी हुसेन शेख,
दिव्यांग – पृथ्वीराज विष्णू चव्हाण
अधिक वाचा –
– किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
– ‘मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…’, अखेर त्या चर्चांना आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पूर्णविराम । MLA Sunil Shelke
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke