Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही इमारत उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान गुरुवारी (दि.6) सायंकाळच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेत आग आटोक्यात आणली. या आगीमुळे इमारत काळवंडली आहे. नवीन इमारतीमध्ये आग लागल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव नगर परिषदेच्या इमारतीमध्ये वेल्डिंग आणि इतर अनुषंगिक कामे केली जात आहे. इमारतीमध्ये जीआरसी पाईप बसवण्यात आले आहेत. जीआरसी मटेरियल आग पकडणारे असते. त्यामधील स्टील रॉडला वेल्डिंग करण्याचे काम गुरुवारी केले जात होते. सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास वेल्डिंगचे स्पार्किंग प्लास्टिक कागदावर उडाले. प्लास्टिक पेटल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने इमारतीमध्ये काळे डाग पडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नगर परिषदेच्या उप मुख्याधिकारी ममता राठोड यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर