Dainik Maval News : इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथील बंधाऱ्यावर पावसाळ्यात पाणी ओसंडून वाहू लागल्यानंतर तसेच इथे असणारे नैसर्गिक कुंड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावेळी पर्यटकांमध्ये वेगळा उत्साह असतो. अशावेळी पाण्याबरोबर खेळताना अनेकदा काहींचा मृत्यू होतो. याची काळजी म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनकडून पावसाळी पर्यटनासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
- कुंडमळा पर्यटनस्थळी गेली पाच वर्षात अनेक उत्साही पर्यटकांचे नाहक मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुंडमळा पर्यटन स्थळावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांनी दिली.
अशी आहे नियमावली –
शनिवार, रविवारसह इतर दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवणे, कुंडमळ्याच्या पासून काही अंतरावर गाववाल्यांच्या व्यतिरिक्त अन्य वाहनांसाठी नाकाबंदी करणे, हॉकर्स झोन न ठेवणे, आपत्कालीन प्रसंगी अग्नीशमन दलाच्या गाडीची व्यवस्था करणे, समाजकार्यामध्ये कार्यरत असलेल्या वन्यजीव रक्षक संस्थेचे सहकार्य घेणे, कुंडमळा परिसरामध्ये पर्यटकांसाठी वेळेचे निर्बंध ठेवणे, पाण्याबरोबर खेळताना पर्यटकांच्या माहितीसाठी खबरदारीचे फलक लावणे आदी उपाययोजना आणि निर्बंध लागू केल्याचे पोलीस निरीक्षक रायन्नावर यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway