तळेगाव दाभाडे परिसरात अनेक खानदेशी बांधव नोकरी निमित्त स्थायिक झालेत. मात्र गावी जाताना त्यांना रेल्वे किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ही बाब अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने खानदेश युवा मंच मार्फत तळेगाव ते चोपडा बससेवेची मागणी करण्यात आली होती. आमदार सुनिल शेळके यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश येऊन रविवारी (दि. 14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तळेगाव ते चोपडा एसटी बससेवा सुरु झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मागील वर्षी एप्रिल महिन्यात ही मागणी करण्यात येऊन पहिले निवेदन देण्यात आले होते. तेव्हापासून तब्बल 11 महिने सतत पाठपुरावा सुरू होता. अखेर रविवारी साडेसहा वाजता ही प्रतिक्षा संपली आणि पहिली बस मार्गस्थ झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एसटीचे वाहक आणि चालक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ( Talegaon Dabhade to Chopda Khandesh regular ST Bus service started )
यावेळी खानदेश विकास युवा मंच अध्यक्ष उमेश पाटील, सहकारी पदाधिकारी, जेष्ठ समिती मधील डॉ शालिग्राम भंडारी, डॉ रोहित मनीयार, डाॅ युवराज बडे, रविंद्र पाटील, मनोहर पगारे, भरत देसले, रविंद्र साळूंके, मुकेश पाटील, शिवाजी पाटील, पवार सर, नितीन पाटील, गोविंद पवार, तायडे साहेब, जयंत संदानशिव, विजयकुमार राठोड, विजय चौधरी आणि तळेगाव परिसरात राहणारे खान्देशवासी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval
– तळेगाव दाभाडे : निकाली कुस्तीत बाला रफिक शेखने पटाकवली चांदीची गदा, ‘या’ बैलजोडीला ‘घाटाचा राजा’ मान
– “भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”