Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे एक आठ वर्षीय हरविलेला चिमुकला काही तासांत पुन्हा पालकांच्या कुशीत विसावला आहे. भरत भगवान घोसले (वय 8, रा. तळेगाव दाभाडे) असे या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 20) दुपारी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना इंदोरी बायपास येथे आठ वर्षीय मुलगा आढळला. तो त्याच्या पालकांना शोधत होता. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याला पुरेशी माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन संवाद साधला असता त्याने केवळ बडा अस्पताल एवढेच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटल परिसरात त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की एक दाम्पत्य त्यांच्या हरविलेल्या मुलाला शोधत आहे. पोलिसांनी संबंधित दाम्पत्याशी संपर्क केला. आपले आई वडील दिसताच मुलगा आई-वडिलांच्या कुशीत विसावला. पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे मुलगा अवघ्या काही तासात त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूपपणे पोहोचला. या कामगिरीबद्दल तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे कौतुक होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News