Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने यावर्षी थकीत मालमत्ता कराची 100 टक्के वसुली करण्याचा निर्धार केला होता. याबाबत मालमत्ता धारकांना नोव्हेंबर 2024 मध्ये नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी यंदा तळेगाव नगर परिषदेने तीव्र मोहीम राबवली असून यात कराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. जवळपास अशा एकूण 42 मालमत्तांना सील करण्याची कारवाई नागरपरिषदेकडून करण्यात आली आहे.
- सदर कारवाईत मोबाईल टावर, नॅशनल हायवे कंपनी यांची मिळकत कर थकबाकी असल्याने आणि शासकीय थकबाकी अशी एकूण 15 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी आहे. न्यायालयात प्रकरण असल्यामुळे शंभर टक्के वसुली होऊ शकली नाही.
प्रशासनाने राबविण्यात आलेल्या मोहिमेत मार्च अखेर 21 कोटी 90 लाख रुपये वसूल केले आहेत. तर 15 कोटी 88 लाख रुपयांची वसुली न्यायालयाच्या फेऱ्यात अडकली आहे.
दरम्यान नोटीस दिल्यानंतर देखील थकीत कर भरणा करण्यात आला नाही. अशा कर चुकविणाऱ्यांच्या बेचाळीस मालमत्तांना नगरपरिषदेकडून सील ठोकण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News