Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शासनाच्या ‘अभय योजने’ची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर आकारण्यात आलेल्या दोन टक्के दंडात्मक व्याजावर शंभर टक्के सूट देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
सन २०२५-२६ अखेरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करताना मागील वर्षांच्या थकबाकीवरील दंडात्मक व्याज माफ करून केवळ मूळ कराची रक्कम भरण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन त्वरित कर भरणा करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली मोहीम वेगाने सुरू आहे. यंदा ३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी १२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
‘१९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना ३१ मार्च २०२६ पर्यंत कर भरल्यास २ टक्के दंडात्मक व्याजाची संपूर्ण माफी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित भागातील लिपिक अथवा कर विभागाशी संपर्क साधावा., असे आवाहन कर अधिकारी लाडे यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू