Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग व पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा व तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव दाभाडे आयोजित करण्यात आला होता.
गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव, मावळ तालुका मुख्याद्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सुतार ,पंचारत समिती मावळच्या ज्योती लावरे, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, अशोक धनोकार,प्रकाश खांदवी अशोक पवार आदी उपस्थित होते.
परीक्षक म्हणून कालिदास शिरपूरकर ,सुरेखा रासकर,किर्ती मोहरीर,अनुराधा कुलकर्णी, नंदिता समद्दर,तृप्ती आगरवाल यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश सुतार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,संयोजन व सर्वांचे आभार पंचायत समितीचे विषयतज्ञ ज्योती लावरे यांनी मानले.
सदर तालुकास्तरीय अखिल भारतीय विदयार्थी मेळावा १८ शाळांतील १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत शाळांतील ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
तालुकास्तरीय अखिल भारतीय विदयार्थी मेळावा स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे ;
१)प्रथम क्रमांक- श्रेया देवळालकर सरस्वती विद्यामंदिर तळेगाव ,
२)द्वितीय क्रमांक- अदिती गराडे आदर्श विद्यामंदिर तळेगाव
३) तृतीय क्रमांक- दिक्षा जमादार -सह्याद्री इंग्लिश मेडीयम स्कुल
तर तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर तळेगाव प्रथम क्रमांक ,पंडित नेहरू विद्यालय कामशेत द्वितीय क्रमांक व रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव तृतीय क्रमांक मिळवला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – जाणून घ्या योजनेबद्दल
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश