व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप

नानोली तर्फे चाकण (ता. मावळ) शाळेमध्ये यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Sports-Competition-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


नानोली तर्फे चाकण (ता. मावळ) शाळेमध्ये यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंना बक्षिस आणि टीशर्ट वाटप करण्यात आले. आज बुधवार (दि. 17) रोजी हा सोहळा पार पडला. नानोली तर्फे चाकण ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ उपस्थित होते. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख सुहास विटे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मावळ तालुक्यातील सर्व विजयी स्पर्धकांनी खिलाडू वृत्तीने तालुक्याचे नाव जिल्ह्यात झळकावे. प्रथम क्रमांक जास्तीत जास्त यावेत, यासाठी एकीची भावना तयार व्हावी. त्यासाठीच आज म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक प्रकारचा स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आला आहे. भविष्यात देखील विद्यार्थ्यांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध राहील,’ असे आश्वासन दत्तात्रय पडवळ यांनी यावेळी बोलताना दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्पर्धा आणि विजयी शाळा :
खो-खो लहान गट मुले – कोंडीवडे शाळा
खो-खो लहान गट मुली – नानोली तर्फे चाकण शाळा
खो-खो मोठा गट मुले – शाळा येलघोल शाळा
खो-खो मोठा गट मुली – अनिर्णीत
कबड्डी लहान गट मुले – वहाणगाव शाळा
कबड्डी लहान गट मुली – थुगाव शाळा
कबड्डी मोठा गट मुले – सुदूंबरे शाळा
कबड्डी मोठा गट मुली – साते शाळा
प्रश्नमंजुषा, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी, वकृत्व स्पर्धा यांत तालुक्यातील लहान-मोठे गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. ( Taluka Level Sports Competition at Chakan Tarfe Nanoli )

सुहास विटे, राजेश राऊत, संदीप कांबळे, सुरेश पाटील, गेनभाऊ मोरमारे, नितीन वाघमारे, सचिन आम्रुळे, तानाजी शिंदे, जालिंदर जगताप, शशिकांत वायाळ, संजय ठाकर, राजेंद्र शेंडे, सुनील शेडगे, महेश गेंगजे, नवनाथ आडकर, कैलास जगताप, विष्णू मोरे, सुनीता मोरे, अविनाश बधाले, वैभव कारले आदी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. सरपंच मोनिका शिंदे, उपसरपंच अनिता बोराडे, माजी सरपंच पोपटराव लोंढे, मनीषा मखामले, स्वप्निल शिंदे, सुरेखा लोंढे, कविता काळे, वर्षा शिंदे, काजल गव्हाणे आदी ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ आडकर यांनी केले. प्रास्ताविक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाथाभाऊ लोंढे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत तुकाराम केदार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार तालुक्याचे शिक्षक संघाचे माजी कोषाध्यक्ष सचिन आंब्रुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी नानोली आणि शाळेचे मुख्याध्यापक बबनराव कोळेकर आदर्श शिक्षिका भारती शेटे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते देहू गावात श्री देवदर्शन यात्रा समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन । Dehu News
– बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade
– लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval

Next Post

मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Viksit-Bharat-Sankalp-Yatra

मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.