Dainik Maval News : टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी हे दोन्ही भारतातील वाहन उद्योगातील प्रमुख ब्रँड आहेत. या ऑटोमेकर्सच्या गाड्या देशभरात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीने वर्षानुवर्षे भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही विभागात वर्चस्व गाजवले होते. कार विक्रीच्या अहवालात मारुतीची वाहने सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायची. आता मात्र टाटा मोटर्सच्या एसयूव्हीने मारुती सुझुकीच्या कारला मागे टाकले आहे. Autocar Pro च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV कार म्हणून टाटाची ‘पंच एसयूव्ही’ ही कार अव्वल ठरली आहे.
टाटा पंचने विक्रीत मारुती वॅगनआरला मागे टाकले आहे. टाटा मोटर्सची कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही बनण्याची चार दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. टाटा पंचची 2024 मध्ये 2.02 लाख युनिट्सची विक्री केली गेली. तर गेल्या वर्षी मारुती वॅगनआरने 1.91 लाख युनिट्सची विक्री झाली. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंचने विक्रीच्या बाबतीत मारुतीच्या वॅगनआर आणि स्विफ्टला मागे टाकले आहे.
यातून आणखीन एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, भारतीय ऑटो मार्केटमध्ये SUV ची मागणी वाढत असल्याचे दिसते. देशातील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये तीन SUV चा समावेश आहे. टाटा पंचाच्या आधी मारुती एर्टिगा 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली होती. रिपोर्ट्सनुसार ही SUV यंदाच्या विक्री अहवालात चौथ्या स्थानावर आली आहे. याचा अर्थ आज लोक प्रीमियम वाहने आणि एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत.
भारतीय वाहन उद्योगाने गेल्या वर्षी (2024) विक्रमी विक्री केली आहे. 2024 मध्ये एकूण 42.86 लाख वाहनांची विक्री झाली आहे. त्याच वेळी वाहनांच्या विक्रीतील मारुती सुझुकीचा बाजार हिस्सा 2018 मध्ये 52 टक्के होता, तो 2024 मध्ये 41 टक्क्यांवर घसरला आहे. SUV बाबत लोकांच्या बदलत्या मागणीमुळे मारुतीचा बाजारातील हिस्सा कमी झाला नाही तर या ब्रँडच्या मॉडेल रँकिंगवरही परिणाम झाला आहे. दुसरीकडे टाटावर विश्वास वाढताना दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या