Dainik Maval News : टाटाची कार म्हणजे विश्वास… गेली अनेक दशके देशातील कोट्यवधी नागरिकांचा, कारप्रेमींचा विश्वास जपण्याचे काम ‘टाटा मोटर्स’ने केले आहे. मावळ तालुक्यातही तळेगाव दाभाडे येथील ‘पंचजन्य ऑटोमोबाईल’द्वारे टाटाच्या कारची विक्री केली जात असून कारप्रेमींचा हा विश्वास जपण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे मावळकर नागरिकांची कार खरेदीची पहिली पसंत ही आता ‘पंचजन्य’मधील टाटाची कार बनली आहे.
- हाच विश्वास अधिक वाढविण्यासाठी आणि मावळची ओळख असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना टाटाची कार खरेदी करणे अधिक जलद व सोपे व्हावे यासाठी ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवात अत्यंत सोप्या प्रक्रियेतून आणि आकर्षक सवलतीच्या दरात ग्रामीण भागातील नागरिकांना टाटाची कार खरेदी करता येणार आहे. सध्या पवन मावळ विभागातील कडधे येथे ‘पंचजन्य’मार्फत ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ सुरु आहे.
कडधे येथे सुरू असलेल्या ‘पंचजन्य’च्या या टाटा ग्रामीण महोत्सवाची खास वैशिष्ट्ये म्हणजे कार घेण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांना शंभर टक्के कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच सध्या ग्राहकाकडे कोणती कार असेल तर त्या कारची सर्वोत्तम एक्सचेंज प्राइज, एक्सचेंज बोनससह थेट बुकींगची सोय आहे. तसेच टाटाच्या प्रत्येक स्टॉक कारवर अविश्वसनीय डिस्काउंट देखील येथे मिळत आहे.
पवन मावळातील कडधे गावात सुरु असलेल्या या टाटा ग्रामीण महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. यामुळे गाव खेड्यातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर कार बुकींग करता येत असून आपले कारचे स्वप्न पूर्ण करता येत आहे. पंचजन्य ऑटोमोबाईल तळेगाव दाभाडे शाखेच्या मॅनेजर स्नेहल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावखेड्यातील नागरिकांना सहज सोप्या प्रक्रियेतून टाटाची कार घेता यावी, कारची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला आहे. सध्या कडधे येथे टाटा ग्रामीण महोत्सव सुरू असून नंतर तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
Tata Rural Festival in Maval Taluka Organized by Panchjanya Automobile Talegaon Dabhade