Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि. ११ ) पहाटे एक भीषण अपघात झाला. एका टेम्पोने दिलेल्या धडकेत एका २० वर्षीय चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
सचिन कुमार (वय २० मुळ राह. माधौगड, जालौन, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ३४.५०० येथे पुणे मार्गिकेवर हा अपघात घडला.
फुड मॉल समोर स्कुटी दुचाकीवर सचिन कुमार चहा विक्री करत होता. पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका भरधाव टेम्पोची धडक सचिन कुमार याच्या दुचाकीला बसली आणि यात त्याचा मृत्यू झाला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित