व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तुलाच काळजी रे, तुझी तुलाच काळजी रे…’ तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याची दुर्दशा सांगणारे हे गीत होतंय व्हायरल

मावळ, खेड, शिरूर या तालुक्यांना जोडणारा तळेगाव - चाकण - शिक्रापूर हा रस्ता आता रस्ता नसून जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 11, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
tulach kalaji re song describing plight of Talegaon Chakan Shikrapur road goes viral

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ, खेड, शिरूर या तालुक्यांना जोडणारा तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा रस्ता आता रस्ता नसून जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. जागोजागी खड्डे, चिखल, अरूंद मार्ग, अतिक्रमणांनी वेढलेला हा रस्ता नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, सामान्य नागरिकांसाठी काळ हून वेगळा नाही. ह्या रस्त्याच्या विकासासाठी शासनाने निर्णय घेतला असला तरीही तो प्रत्यक्षात उतरण्यास बराच अवधी जाणार, तोपर्यंत खड्डेयुक्त रस्त्यामुळे सामान्यांचे हाल हे होतच राहणार. अशा परिस्थितीत तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याची दुर्दशा सांगणारे एक गीत अक्षय लांडे या गीतकाराने रचले असून गायक शनेश खजिरे याने ते गायले आहे. हे गीत सध्या व्हायरल होत आहे.

वाचा संपूर्ण गीत ;
“कामाव येताना माघारी जाताना, चाकण रस्त्यांवरी…
चिखल वाट नि पाऊस पाणी हा खेळ कुठवरी,
ट्रॅफिक आणि ह्या खड्ड्यांचे घेऊन ओझे तू जीवावरी…
वाट पाही घरी बायका पोरं तु
आठव गझाल कालची रे,
तुलाच काळजी रे तुझी तुलाच काळजी रे !

काय आजकालचे हे, नेते वर खालचे हे,
लाज ना कशाची ,न भय कुठले…
खाऊनी तुपात रोटी, देऊनी आव्हाने खोटी,
माणसाच्या रूपी हैवान भेटले…

खळगी पोटाची भरण्या निघता सोडून वाऱ्यावं घरं,
दिवस माझा, की शेवट जिवाचा
समदंचं नशिबावरं

शाप जणू हा कर्माला
नि माणुसकीच्या धर्माला ..

उगीच वेगाने गाडीच्या निष्पाप
जीव तू घेऊ नको,
होऊ दे झालातं उशीर जरासा
घाई तू करू नको,
ट्रॅफिक काल नी, आज ही, उद्या ही,
धीर तू सोडू नको,

वाट पाही घरी बायका पोर तू
आठव गझाल कालची रे…
तुलाच काळजी रे, तुझी तुलाच काळजी रे !”

गीत : तुलाच काळजी रे
गीतकार : अक्षय लांडे
गायक : शनेश खजिरे

पाहा गीत :

 

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ; राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे आवाहन
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या धडकेत चहा विक्रेत्याचा मृत्यू । Mumbai Pune Expressway

Next Post

जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत व्यावसायिकाला अडवून लुटले । Kamshet News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet-Police-Station

जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत व्यावसायिकाला अडवून लुटले । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.