मावळ शिक्षण प्रतिष्ठान ( Maval Education Foundation ) यांच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे ( Teacher Day ) औचित्य साधून तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथे शिक्षक कृतज्ञता दिन ( Teacher Appreciation Day ) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सर्वच विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे ही शिक्षकांनी रुजवलेली असतात. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न केले, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. शिक्षकांकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आधुनिक आणि नव्या प्रवाहांशी जुळवून घेत संस्था अग्रक्रमाने काम करत आहे. यात संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी या सर्वांचेच योगदान आहे. शिक्षकांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेने आयोजित केलेल्या कृतज्ञता दिनानिमित्त मला उपस्थित राहता आले, याचा आनंद आहे’, असे मनोगत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संभूस मॅडम वयाच्या 83 व्या वर्षी देखील आदर्श विद्यामंदिर येथे ज्ञानदानाचे कार्य करत असल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार शेळके यांच्यासमवेत संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार काळोखे, सचिव यादवेंद्र खळदे, खजिनदार नंदकुमार शेलार, सदस्य दत्तात्रय बाळसराफ आदी मान्यवर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. ( Teacher Appreciation Day organized by Maval Education Foundation at Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे बंधू सुधाकर शेळकेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, शेळकेंनी आरोप फेटाळले