Dainik Maval News : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयातील कार्यरत शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.
तृप्ती निकम यांच्याबरोबरच मावळ तालुक्यातील दिवड येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शशिकांत जाधव, वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका जयश्री बोरसे, माळेगाव वरसुबाई माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक राजेंद्र भांड तसेच तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्यामंदिर विद्यालयातील शिक्षक श्रीहरी तनपुरे आणि संभाजी ठाकूर यांचाही जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देत गौरवण्यात आले.
राजगुरुनगर येथे रविवारी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार बाबाजी काळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) संजय नाईकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मानसोहळा पार पडला.
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर संघाचे सचिव रामदास रेटवडे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष उत्तमराव पोटवडे यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha

