Dainik Maval News : शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन योग्य दिशा दाखविणारा मुख्य स्रोत आहे, असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी तळेगाव दाभाडे येथे व्यक्त केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंजिनिअर कॉलेजमधील शिक्षकांच्या शिक्षक दिनानिमित्त संतोष खांडगे बोलत होते.
पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात आणि त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. त्यामुळे शिक्षकांना या योगदानाबद्दल संस्थेच्या आदराने गौरव करून शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला जातो.
यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, रोटरी क्लबचे उपप्रांतपाल विन्सेंट सालेर, रोटरी कल्ब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष, प्रविण भोसले, सचिव संदीप मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आंतोष मालपोटे, उमा पवार, सुषमा गराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेतील सर्व शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. यावेळी बोलताना गोपाळे गुरुजी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान सर्वात वरचे मानले जाते. एक चांगला शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रामाणिकपणा, परिश्रम, शिस्त आणि सहनशीलता यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. ज्ञानाबरोबरच ते आपल्याला चांगले माणूस बनण्याची शिकवणही देतात.
यावेळी संस्थेचे संचालक महेशभाई शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन भारत काळे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena