व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे भीषण अपघात ; 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू । Maval News

जुना पुणे - मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा ( ता. मावळ ) येथे भरधाव हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 16, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Accident

File Photo : Accident Image


Dainik Maval News : जुना पुणे – मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा ( ता. मावळ ) येथे भरधाव हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) रात्री सुमारे 10.20 वाजताच्या सुमारास माउली हॉटेल समोर घडला. अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांनी अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे आहे. तो मोटारसायकल (क्र. एम.एच 14 एल.वाय. 3205) वरून रस्ता ओलांडत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने जोरदार धडक दिली. या धडकेत अविनाश दोडमणे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तसेच त्याच्या मोटार सायकलचेही मोठे नुकसान झाले.

याबाबत मृत तरूणाचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, धंदा– मोटारसायकल सेल्स मॅन, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हायवा चा चालक हा अविचाराने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवून आणला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी थांबून मदत न करता पळून गेला.

अपघातात अविनाश दोडमणे याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी हायवा वाहन चालकाविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम-281, 125 (b), 106, 324 (4), मो. वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena


dainik maval jahirat

Previous Post

शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन योग्य दिशा दाखविणारा मुख्य स्त्रोत – संतोष खांडगे । Talegaon Dabhade

Next Post

श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीला प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bengal monitor injured in dog attack was saved by prompt action of animal lovers

श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीला प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.