मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणारे अपघात काही केल्या थांबताना किंवा कमी होताना दिसत नाहीत. आज (गुरुवार, 29 डिसेंबर) पुन्हा एकदा मुंबई पुणे महामार्गावर अंडा पॉइंट येथे अपघात झाला. अपघात किरकोळ स्वरुपाचा असला तरीही यात वाहनांचे नुकसान झाले असून एक चालक जखमी झाला आहे. ( Tempo Accident Near Anda Point on Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच 04 एफयू 0430 ) याचा ब्रेक फेल झाल्याने वाहनाचा वॅगनर कार ( क्रमांक एमएच 04 एफवाय 2007 ) आणि स्विफ्ट डिझायर कार ( क्रमांक एमएच 46 एयू 3923) सोबत अपघात झाला. यात आयशर टेम्पोच्या ड्रायव्हरला (नाव – विद्यासागर निषाद वय 21) किरकोळ मार लागला.
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना : मंत्री शंभूराज देसाई
विजय भोसले, अमोल कदम आणि शैलेश मांडवकर यांनी सदर चालकाला ॲम्बुलन्समधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले, तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. ( Tempo Accident Near Anda Point on Mumbai Pune Expressway )
अधिक वाचा –
– बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी इंदोरीतील दोन जणांना अटक, पोकलेन-ट्रॅक्टर जप्त
– नववर्षाचे स्वागत करा तुमच्या आवडीच्या ठिकाणी; मावळ तालुक्यातील ‘ही’ 3 पर्यटनस्थळे सर्वांनाच खुणावतायेत