रविवारची (दि. 7) सकाळ ही एका भीषण अपघाताने झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज रविवार, दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 06:05 वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर नवीन बोगद्यामध्ये किमी 39:200 दरम्यान हा अपघात झाला. द्रुतगती मार्गावर उतारावर टेम्पो (क्रमांक GJ 15 XX 9283) वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टेम्पो पुढील कंटेनरवर आदळला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पुढे जात असणाऱ्या कंटेनर (क्रंमांक MH 46 BM 1169) याला टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघातात टेम्पोचे पुढील केबिन पुर्णपणे दबून गेले. त्यात टेम्पो चालक विनोद यादव (रा. वापी, गुजरात) हा केबिनमध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत पावला आहे. अपघाताची माहिती मिळताच त्याठिकाणी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, मृत्युंजय देवदूत टीमने मदत केली. ( tempo driver died in an accident near new tunnel on Mumbai Pune Expressway )
खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे मृत चालकाचे शव नेण्यात आले असून सदर अपघात हा खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने पुढील कार्यवाही सुरू आहे. या अपघातातील बाधित वाहने बाजूला घेण्यात आली असून तातडीने वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
अधिक वाचा –
– वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval
– मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ
– जय शिवराय..! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार