Dainik Maval News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सर्व निर्णय :
1. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. 149 कोटीस मान्यता
2. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ
3. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
4. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील
5. शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन
6. सहा हजार कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित 37 हजार कोटी खर्चास मान्यता
7. नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष
8. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार
नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे –
राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम 1965 मध्ये याबाबत सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वित्रिक निवडणूका 2021-22 मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षांता करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Term of Mayor of Nagar Panchayat will be Five Years Maharashtra cabinet meeting decision )
अधिक वाचा –
– तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक
– श्रावणी सोमवार निमित्त रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये फराळ वाटप । Ravindra Bhegade
– महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News