Dainik Maval News : जुना पुणे – मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा ( ता. मावळ ) येथे भरधाव हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) रात्री सुमारे 10.20 वाजताच्या सुमारास माउली हॉटेल समोर घडला. अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांनी अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे आहे. तो मोटारसायकल (क्र. एम.एच 14 एल.वाय. 3205) वरून रस्ता ओलांडत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने जोरदार धडक दिली. या धडकेत अविनाश दोडमणे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तसेच त्याच्या मोटार सायकलचेही मोठे नुकसान झाले.
याबाबत मृत तरूणाचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, धंदा– मोटारसायकल सेल्स मॅन, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हायवा चा चालक हा अविचाराने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवून आणला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी थांबून मदत न करता पळून गेला.
अपघातात अविनाश दोडमणे याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी हायवा वाहन चालकाविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम-281, 125 (b), 106, 324 (4), मो. वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena