Dainik Maval News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर साते गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे दीड वाजल्याच्या सुमारास उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जन जखमी झाले आहेत.
खांगाराम पन्नाराम चौधरी, (वय-४७ वर्षे, रा. रहाटणी, पुणे) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून पुनाराम हकारामजी चौधरी, (वय ३९ वर्षे, रा. थेरगाव, पुणे ) व स्ताराम भबुताजी चौधरी, (वय -४५ वर्षे, रा. निगडी, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या वेकटींची नावे आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी (दि.१९) पहाटे दीड वाजल्याच्या सुमारास साते गावचेहद्दीतील पुणे मुंबई महामार्गावरील मुंबई पुणे लेनवर शेर ए पंजाब हॉटेलजवळ महींद्रा कंपनीचे कार (क्र. एम एकह १४ एलए ९८३८) मधून खांगाराम पन्नाराम चौधरी, पुनाराम हकारामजी चौधरी, रताराम भबुताजी चौधरी, हे कामशेत, ता. मावळ येथुन पुणे बाजुकडे येत असताना महामार्गावरून चाललेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ एएस ३०३९ ) याचे पाठीमागे असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागील बाजुस कारने जोरात धडक दिल्याने अपघात झाला.
अपघातात खांगाराम पन्नाराम चौधरी हे मयत झाले आहेत तर पुनाराम हकारामजी चौधरी, रताराम भबुताजी चौधरी, यांना अपघातात किरकोळ मार लागला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन काळे हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News