Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज 5 जुलै 2024 सकाळी 7 वाजताच्या सुमारास महामार्गावरील मुंबई वाहिनीवर किमी 39:000 नवीन बोगद्यात एक भीषण अपघात झाला. अपघातात ट्रेलर कंटेनर वाहन (क्रमांक MH 43 CE 3217) आणि गॅस टँकर वाहन (क्रमांक MH 04 HD 9198) आणि कार वाहतूक कंटेनर (क्रमांक NL 01 AD 3146) ही तीनही वाहने एकमेकास धडकली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर अपघातात गॅस टँकर वरील चालक अक्षय ढेले हा गाडीमध्ये अडकल्याने जागीच मृत पावला. तर कार वाहतूक कंटेनर वरील चालक पळून गेला आहे. गॅस टँकर क्रमांक (MH 04 HD 9198) वरील चालक अक्षय वेंकटराव ढेले (वय 30 रा.अहमदपूर – कुमठा, जि.लातूर) हा अपघातात दुदैवाने मयत पावला आहे. ( Terrible accident involving three vehicles on Mumbai Pune Expressway driver dies on the spot )
अपघातातील मृतास लोकमान्य रुग्णालयाच्या ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका दवाखान्यामध्ये रवाना केले आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी या अपघातात मदत कार्य केले. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने अपघात प्रसंगी मदतकार्य केले, वाहतूक सुरळीत केली. अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला आहे.
अधिक वाचा –
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटींची तरतूद ; अर्ज प्रक्रियेत महिलांची अडवणूक खपवून घेणार नाही
– महत्वाचे ! झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर, गर्भवतींसाठी विशेष सूचना, वाचा सविस्तर
– प्रशासनाच्या ‘त्या’ जुलमी कारवाईनंतर उसळला जनक्षोभ ; भुशी धरण परिसरातील स्थानिक व्यावसायिकांचा आक्रमक इशारा । Lonavala News