Dainik Maval News : जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत शहर हद्दीतील खिंडीजवळील तीव्र उतारावर होणाऱ्या अपघातांची मालिका काही खंडित होताना दिसत नाही. शुक्रवारी (दि. 18) देखील सकाळी या तीव्र उतार व वळण मार्गावर झालेल्या अपघातात एका टेम्पो चालकाचा बळी गेला असून अपघातामुळे वाहतूक देखील बराच वेळ खोळंबली होती.
वाहनाचा क्लिनर सुनील पोपट उमाप (वय 29 वर्षे, रा. बुगेवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याने याप्रकरणी कामशेत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपघातात मृत झालेला वाहनाचा चालक ऋशीकेष भाऊसाहेब बुगे (वय 27 वर्ष, रा. बुगेवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कामशेत पोलीस ठाण्यात स्टेशन गु.र.नं. 144/2025 नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम सन 2023 चे कलम 106,281,125(A),125(B),324(5) मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 18 जुलै) सकाळी सात वाजता कामशेत शहर हद्दीत जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर खिंडीजवळ हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो वाहन (क्र. एम.एच. 16 डी.पी. 1711) वरील चालक ऋशीकेष भाऊसाहेब बुगे (वय 27) याने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने भरधाव वेगात चालवून रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालविला. यामुळे उतारावरील वळणावर टेम्पो कंट्रोल न झाल्याने टेम्पो डिव्हाईडरला धडकून रोडचे विरूध्द लेनचे बाजूस पलटी झाला. यावेळी चालकाने टेम्पोमधून बाहेर उडी मारली असता तो टेम्पोखाली सापडून गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मृत्युस व वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पोवार हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी