मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातीस अत्यंत दुर्गम अशा वारु गावातील गुणवान खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. याआधी तृप्तीने इतरही अनेक देशांमध्ये जाऊन थायबॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळवली आहेत. परंतू, तिच्या आताच्या यशाबद्दल तृप्तीचे सर्वत्र कौतूक होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तृप्तीचा आदर्शवत क्रीडाप्रवास –
2018 साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या 2017 मध्ये तृप्तीने थायबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आसाम इथे याच स्पर्धेत रजत पदक मिळवले आहे. गोवा येथे आंतराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तर याआधी अनेक स्पर्धेत तब्बल 69 पदके मिळवले आहे. तृप्ती तिला अनेक स्पर्धेत भारत देशाचे नाव देशाच्या विविध देश पातळीवर उचवायचे असल्याचे तिने सांगितले आहे. ( Thai Boxing Player Trupti Shyamrao Nimble From Varu Village Of Maval Taluka In Pune District )
तृप्ती हि उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर येथे शिक्षण पुर्ण केले असून ती आता क्रीडा शिक्षण विभागात नोकरी करत आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे घरातुनच मिळाले आहे. तिचे वडिल हे पुणे जिल्ह्यातील कुस्तीक्षेत्रातील मल्लसम्राट शामराव निंबळे अशी ओळख आहे. शामराव निंबळे यांना तीन मुली प्रिती, करिष्मा आणि तृप्ती तर आई गृहणी जिजाबाई आहे. तिचा भाऊ हा कुस्तीक्षेत्रातच होता.
भावाच्या अपघाती निधनानंतर तृप्तीने केला निर्धार –
सन 2014 मध्ये तृप्तीच्या भावाचे आपघाती निधन झाले. याबद्दल बोलताना तृप्तीने सांगितले की, “मला माझ्या भावाचे व वडिलांचे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खेळायचे आहे. आजवर मी अनेक पदके मिळवलीयेत. पण यापुढेही खेळत राहणार असून यापुढेही देशासाठी पदके मिळवणार आहे.” असे तिने सांगितले आहे. तृप्तीची मोठी बहिण करिष्मा सनी बारणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहे. तृप्तीमुळे संपूर्ण मावळ सह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हाचे नाव लौकीक झाले आहे. तृप्तीला क्रीडा शिक्षक टि. वाय. अत्तर याचे मार्गदर्शन लाभले आहे.
“महिलांनी क्रिडा क्षेत्रात काम करुन आपल्या भारत देशाचे नाव पुढे घेऊन जावे व एकदा क्रिडा क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. पंरतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवावी लागते. त्यामुळे मी आज विविध राज्य व देशभरात खेळून आले असल्याने मला या सर्व गोष्टींचा अनूभव आहे. मी यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे व माझ्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार आहे. मला यापुढे शासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याची इच्छा आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.” – तृप्ती शामराव निंबळे
अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti