पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील शिळींब गावात ( Shilimb Village ) चोरीची घटना ( Theft ) घडली आहे. शिळींब गावातील मुख्य चौकात असलेले शेखर जगताप यांच्या मालकीचे किराणा ( Grocery Store ) दुकान चोरट्यांनी फोडले असून दुकानातील काही सामान, वस्तू यांसह पैसे लंपास केले असल्याची माहिती शेखर जगताप यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जगताप हे नेहमीप्रमाणे सोमवारी (17 ऑक्टोबर) रात्री 8 वाजता दुकान बंद करुन घरी गेले, त्यानंतर आज (मंगळवार, 18 ऑक्टोबर) रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता त्यांना दुकानाचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती गावचे पोलिस पाटील संदीप बिडकर यांना दिली.
दुकानातील किराणा माल, यांसह गल्ल्यात असलेली काही रक्कम असा काही हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचे शेखर जगताप यांनी सांगितले. ( Theft in Shilimb Village Thieves Broke into Grocery Store )
शिळींब गावातील मुख्य चौकात अनेक दुकाने आहेत. त्यात शेखर जगताप यांचेही किराणा मालाचे दुकान आहे. ‘पिकेल ते विकेल’ या शेतीपूरक तत्वावर शेखर जगताप यांनी किराणा दुकान सुरु केले. त्यांनी गावातील चौकात सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासाठी अनेकदा मागणीही केली होती. मात्र त्याला ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आता या चोरीच्या घटनेनंतर तरी ग्रामपंचायतीला जाग येणार का? असा सवाल शेखर जगताप यांनी विचारला आहे. ( Theft in Shilimb Village Thieves Broke into Grocery Store )
अधिक वाचा –
शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा
मावळमध्ये कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश, नियोजनात्मक शेतीमुळे भातपिक जोमात, पावसाच्या तडाख्यापासूनही बचाव