Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आढले येथील पाझर तलावाजवळ असलेल्या विद्युत रोहित्रातील तांब्याची काईल व ऑइल असा एकूण ५५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली.
गणेश बजरंग गायकवाड (वय ३५, रा. श्रीसंत ज्ञानेश्वर कॉलनी, दिघी) यांनी रविवारी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या मावळ तालुक्यातील आढले गावातील पाझर तलावाजवळ असलेल्या विद्युत रोहित्रातून ३० हजार रुपये किंमतीची ६० किलो वजनाची तांब्याची कॉइल, तसेच २५ हजार रुपये किंमतीचे ४० लिटर ऑइल असा एकूण ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना रविवारी मध्यरात्री एक ते सहाळी पावणे आठ वाजताच्या दरम्यान घडली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ