व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News

मावळ मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 9, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
There is talk former taluka president of Maval MNS Rupesh Mhalaskar is on path of joining NCP Sharad Pawar Party

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार येत्या चार महिन्यांत निवडणुका होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मावळ तालुक्यातही सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात खलबते सुरू झाली असून पक्षप्रवेश, बैठका, चर्चांना वेग आला आहे. या सर्वांत मावळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात लवकरच काही मोठ्या घडामोडी घडण्याची परिस्थिती समोर दिसत आहे.

  • गुढीपाडवा मेळाव्यात भाकरी फिरविण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात संघटनात्मक पातळीवर अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या झाल्या, यात प्रमुख म्हणजे तालुक्याचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या जागी अशोक कुटे यांची नियुक्ती राज ठाकरे यांच्या कडून करण्यात आली. त्यानंतर कुटे यांच्या नेतृत्वात पक्षाने जमिनीवर काम करण्यास सुरुवात केल्याचेही दिसत आहे. परंतु पदावरून पाय उतार झाल्यापासून माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर काहीसे पक्षापासून दूर जात असल्याचे दिसत आहे.

नुकतीच रुपेश म्हाळसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली, तर पक्षाच्या प्रमुख नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. ही भेट वैयक्तिक असल्याचे रुपेश म्हाळसकर यांनी सांगितले असले तरीही त्यांच्या या भेटीनंतर म्हाळसकर हे शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. अशात वडगाव नगर पंचायतीची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता आहे. सायली रुपेश म्हाळसकर यांच्या रुपाने मावळात मनसेचा पहिला उपनगराध्यक्ष निवडून आला होता. त्यानंतर आता पुन्हा सायली रुपेश म्हाळसकर यांनी निवडणुकीची तयारी केलेली दिसते. तर रुपेश म्हाळसकर हेही निवडणुकीच्या तयारीने पाऊले टाकताना दिसत आहे. परंतु मनसेच्या या लढवय्या नेत्याला पक्षप्रमुखांनी पदावरून दूर केल्याने रुपेश म्हाळसकर काहीसे नाराज असल्याचे दिसत आहेत.

याच परिस्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून नवी राजकीय सुरूवात करण्याची शक्यता रुपेश म्हाळसकर नाकारू शकत नाहीत. तसेच त्यांच्या मागे असलेली लोकांची ताकद आणि लोकसंघटन यांमुळे कुठलाही पक्ष त्यांना आपल्याकडे ओढण्यास इच्छुक असेल, यात शंका नाही. परंतु मनसेचा हा मावळचा सेनापती अन्य पक्षात जाणार की पक्षात राहुुनच आपले राजकारण सुरू ठेवणार, हे लवकरच समजेल.

मी मनसेत… पण…
शरद पवार, सुप्रिया सुळे यांची रुपेश म्हाळसकर यांनी भेट घेतली, याचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. अशात स्वतः रुपेश म्हाळसकर यांनी पक्षप्रवेशाच्या वृत्तांचे खंडन केले, व आपण कुठेही जात नसून मनसेत राहणार असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे त्यांच्या सोशल मीडिया अकांटवर ‘अंतः अस्ति प्रारंभः’ या टॅगलाईनसह पवार भेटीचा पोस्ट केलेला व्हिडिओ बरेच काही सांगून जातो. त्यामुळे लवकरच मावळ मनसेत मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News

Next Post

वडगाव मावळ येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lok-Adalat

वडगाव मावळ येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.