Dainik Maval News : देहू येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मी स्टाईल धरपकड देखील झाली. मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान (दोघेही रा. हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
देहूगाव येथील इंडसइंड बँकेच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दरोडा टाकणाऱ्या हरियाणातील टोळीतील दोघांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मोटारीतून पळून गेलेल्या तीन साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री दोनच्या सुमारास घडली.
सीमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०), आझाद खान (४५, सर्व रा. हरियाणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १.५० च्या दरम्यान देहू-आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ थांबलेली पांढऱ्या रंगाची मोटार बीट मार्शल समाधान पटावकर व किरण पाटील यांना दिसली.
पोलीस आल्याचे पाहताच मोटार भरधाव वेगाने गेली. पोलीस एटीएमकडे धावले असता, एटीएमचे शटर उचकटलेले दिसले व आतून उजेड आणि आवाज येत असल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना तातडीने माहिती दिली. पोलिसांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता, दोन संशयित गॅस कटरने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांना पाहून संशयितांनी शिवीगाळ, दगडफेक केली. आरडाओरडा येकून नागरिक घराबाहेर आले. नागरिकांनी ही पोलिसांना मदत केली, आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन