Dainik Maval News : मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळच्या आंदर मावळ विभागातील माऊ हद्दीतील दवणेवाडी येथे असणाऱ्या एका गोशाळेला गुरुवारी (दि.६) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत गोशाळेतील तीन मोठ्या गायी होरपळून मृत पावल्या आहेत. तर अन्य तीन गायी भाजल्याने जखमी झाल्या आहेत.
दवणेवाडी, माऊ येथील ब्रह्म प्रतिष्ठान संचलित गोशाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास आकस्मिक आग लागली. आग लागली तेव्हा गोशाळेत एकून १९ जनावरे होती. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारणे केले. भीषण आगीत गोशाळेतील तीन गायींचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तीन गायी जखमी झाल्या आहेत. जखमी गायींवर पशूवैद्यकीय विभागामार्फत उपचार सुरू आहेत.
- गोशाळेत आग लागल्याचे समजताच तळेगाव एमआयडीसी, वडगाव नगरपंचायत व पीएमआरडीए येथील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप प्रचंड असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागला. अखेर अथक प्रयत्नांनी दुपारी चार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्म प्रतिष्ठान संचलित ह्या गोशाळेत एकूण १९ जनावरे होती. त्यातील ३ गायी गुरुवारी लागलेल्या आगीत मृत पावल्या आहेत. मागील सहा वर्षांपासून सुभाष नारायण देशपांडे हे ही गोशाळा चालवित आहेत. गोशाळेस आग कशामुळे लागली हे समजले नसून देशपांडे यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी विजय चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी विजय दिमते यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचा पंचनामा केला. गोशाळेतील गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तीन गायींवर उपचार सुरु आहेत, बाकी जनावरे सुखरूप आहेत. पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. गोशाळेस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तलाठी चव्हाण यांनी सांगितले.
अग्निशमन दलाचे शंकर वसंतराव पाटील, विशाल चव्हाण, सचिन साळुंखे, मंगेश डावखर, संजय गायकवाड, विनायक नांगरे, अजय चव्हाण यांसह पथकातील अन्य जवान, ग्रामस्थ सर्वांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन