Dainik Maval News : साडूने साडूचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. शनिवारी (दि. ११ ) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलिसांनी घटनेतील आरोपीला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १०/१०/२०२५ रोजीचे रात्री ११:४० ते दिनांक ११/१०/२०२५ रोजीचे सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मौजे मुंढावरे ( ता. मावळ जि.पुणे ) गावचे हददीत इंद्रायणी ब्रिज येथून महेश मारुती अंभोरे ( वय ३३ वर्षे, रा. पांगोळी ब्रिजजवळ, लोणावळा ता. मावळ जि.पुणे ) हा कान्हे फाटा येथील महिन्द्रा कंपनीतुन कामाची सुट्टी झाल्यानंतर तो त्याचे अॅक्टीवा मोटार सायकल ( क्र MH14/FY / 6729 ) वरून कान्हे बाजुकडून लोणावळा बाजूकडे पुणे-मुंबई जुने हायवे रोडने जात होता.
त्यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने महेश अंभोरे यास मुंढावरे येथून खुन करणेचे उददेशाने त्याचे अपहरण करून त्यास कोणत्या तरी वाहनामधून नेहून त्यास हत्याराने मारहान करून त्याचा खून केला. त्यानंतर सदर ठिकाणाचा पुरावा नष्ठ करणेचे उददेशाने त्याचे प्रेत बोरज गावचे हददीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर किमी नंबर ६५ जवळ टाकुन अज्ञात इसम पळून गेले.
याबाबत कामशेत पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमांविरूध्द गु.र.नं. १८९ / २०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ चे कलम १०३ (१), २३८, १४० (१), ३२४ (४) अन्वये दिनांक ११/ १० / २०२५ रोजी दाखल आहे. गुन्हा दाखल होताच, कामशेत पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून लागलीच घटनास्थळी स्टाफसह भेट देवून घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ पोलीस पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवून आरोपीचे शोधासाठी रवाना केले.
सदर घटनास्थळी ठिकाणी कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमी तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर मयतास महेश अंभोरे यास त्याचा साडू गुरूनाथ एकनाथ पाटील ( वय अंदाजे ३२ वर्षे रा. गोल्ड व्हॅली, जैन, लोणावळा ) याने साथीदारासह अपहरण करून त्यास हत्याराने मारहान करून त्याचा खुन केले बाबत माहीती मिळाली. तसेच सदर आरोपी हा वाहनासह कोल्हापूर कडे पळून गेल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना माहीती मिळाल्याने, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीस कोल्हापूर येथील किनी टोल नाका येथे वाहनासह पकडण्यात कामशेत पोलीस पथकास यश आले.
तपासामध्ये यातील आरोपी याने सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली असून मयत व्यक्ती नात्याने त्याचा साडू असलेचे सांगितले आहे. सदरचा गुन्हा हा आरोपीने कोणत्या कारणांकरीता केला आहे, याबाबत अधिक तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पोवार, सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, दत्तात्रय शेडगे, पोलीस अंमलदार समिर करे, गणेश तावरे, कैलास लबडे, अमोल तावरे, रविंद्र राउळ, मगेश मारकड, अमित पाडाळे यांनी केलेली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी