Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ऐतिहासिक किल्ले तिकोणा गडावर भव्य स्वच्छता मोहीम, गड संवर्धन व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारी, दिनांक २७ जुलै रोजी सकाळी सात वाजल्यापासून गडावरील पुरातन वास्तूंसह परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.
‘आपला मावळा’ संघटनेने याकरिता पुढाकार घेतला आहे. नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था संघटनेतर्फे उपलब्ध करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर चे खासदार निलेश लंके हेही या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत.
मावळ तालुक्यातील गडकिल्ले प्रेमी तरुणांनी आपली नोंदणी करुन सदर मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ‘आपला मावळा’ संघटनेचे तळेगाव दाभाडे येथील समन्वयक अभिजित सोनवणे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा