मुळशी ( Mulshi Taluka ) तालुक्यातील पौड ( Poud ) येथील न्यू संगम बेकरी ( New Sangam Bakery ) या प्रसिद्ध बेकरीच्या खाद्य पदार्थात टिशू पेपर आढळल्याने ( Tissue Paper In Bakery Food ) खळबळ माजली आहे. दिगंबरनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष भास्कर राऊत, सूरज पिंगळे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर बेकरी मालकाला विचारणा करण्यात आली असता त्याने टोलवा टोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्या विरोधात तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती पौड ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद शेलार यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पौड ग्रामपंचायतचे सरपंच अजय कडू, माजी सरपंच जगदीश लांडगे, सदस्य प्रमोद शेलार आणि शाम नवले यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेकरीची पाहणी केली. तेव्हा तिथे प्रचंड अस्वच्छता आढळून आली. अन्न व औषध प्रशासनाने अगदी खेडोपाड्यात असणाऱ्या अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकाने, खानावळी, बेकरी शॉप यांची तपासणी करुन लक्ष ठेवले पाहिजे, अयोग्य असल्यास कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी प्रमोद शेलार यांनी केली.
न्यू संगम बेकरीचे मालक शराफत यांना घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी चुक मान्य करण्याऐवजी टोलवा टोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी थेट तहसीलदारांकडे तक्रार देण्यात आली आहे. ( Tissue Found Paper In Food of Sangam Bakery Poud Mulshi Taluka Complaint filed )
अधिक वाचा –
ई-पीक पाहणी नोंदणीस शेतकऱ्यांचा निरुत्साह, मुळशीत स्वतः तहसीलदार पोहोचले बांधावर
शेरे गावात ‘अमृतरथ’ स्टॉलचे उद्घाटन, लाभार्थी महिलेच्या चेहऱ्यावर समाधान