रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( RPI ) (आठवले गट) ( Ramdas Athawale Group) मातंग आघाडीचे प्रमुख हनुमंत साठे यांचे दुःखद निधन झाले आहे. आंबेडकर चळवळीचा ढाण्या वाघ म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. ( Hanumant Sathe Passed Away )
एकूण 30 वर्षापासून पासून रिपब्लिकन पक्ष ,पँथर आणि इतर सामाजिक चळवळीत हनुमंत साठे हे कार्यरत होते. वयाच्या अवघ्या 56व्या वर्षी मंगळवारी (13 सप्टेंबर) त्यांचे आजारपणाने निधन झाले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिपब्लिकन पार्टीमध्ये गेले 30 वर्षांपासून ते कार्य करत होते. दलित समाजातील मातंग आणि इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांचं घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांच्या प्रयत्नांतूनच झाले. दलित समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला.
हनुमंत साठे यांच्या मागे त्यांचा मुलगा विरेन, पत्नी सत्यभामा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. दलित चळवळीतील अतिशय संवेदशील असे व्यक्तिमत्व हरपले आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजता धनकवडी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Republican Party of India Ramdas Athawale Group Pune Hanumant Sathe Passed Away )
अधिक वाचा –
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक ठिकाणी घरात घुसले पाणी, नागरिकांची तारांबळ
महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या