भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात रविवारी पावसाने जोरदार ( Pune Heavy Rainfall ) हजेरी लावली. पुणे शहरात आणि परिसरात रविवारी सायंकाळी (11 सप्टेंबर) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे पुण्यात सर्वत्र पाणीच पाणी चहुकडे अशी स्थिती निर्माण झाली होती.
जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ( Rainwater Came Into Police Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुण्यात या भागात साचले पाणी;
चंदननगर पोलिस स्टेशन; वेदभवन, कोथरुड; वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड; लमाण तांडा, पाषाण; सोमेश्वर वाडी, पाषाण; वानवडी, शितल पेट्रोल पंप; बी टी ईवडे रोड; कात्रज उद्यान; स्वारगेट बस स्थानक
https://youtube.com/shorts/2Jwii7AwTFw?feature=share
पुण्यात या भागात कोसळली झाडे;
एनसीएल जवळ पाषाण; साळुंखे विहार, कोंढवा; ज्योती हॉटेल जवळ कोंढवा; चव्हाणनगर; रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन ( Pune Heavy Rainfall Video Rainwater Came Into Police Station House Road )
अधिक वाचा –
Pune Festival 2022 I 34व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न
मोठी बातमी! जगभरातील हिंदू धर्मियांवर शोककळा, सर्वात मोठ्या धर्मगुरुचे निधन