पुणे जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर (दि. 29 एप्रिल) मावळ लोकसभा मतदारसंघात 33, पुणे मतदारसंघात 35 आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात 32 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे लोकसभेसाठी 35 उमेदवार रिंगणात –
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 42 पैकी 7 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ( Total 35 Candidates In Pune Lok Sabha Constituency Election )
यावेळी निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार, खर्च व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी प्रकाश अहिरराव, खर्च प्रमुख महेश अवताडे उपस्थित होते. डॉ. दिवसे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खर्चाचा दैनंदिन लेखा ठेवणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगितले.
उमेदवारांना 95 लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा असून खर्च मर्यादेचे उल्लंघन करू नये. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणूक चांगल्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी उमेदवारांना केले.
अधिक वाचा –
– ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह
– अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण हुकले आणि चिमुकल्यासह 2 नाहक बळी गेले; टाकवे खुर्द हद्दीत महामार्गावर भीषण अपघात
– वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही