Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज (दि. 4 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एकविरा देवी मंदिर येथील होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन केले. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी कान्हे रुग्णालयाचे लोकार्पण आणि अन्य महत्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.
कॅबिनेटमुळे उशीर…
आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला उशीर झाल्याने मावळातील नियोजित कार्यक्रमांना यायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही यायला उशीर झाला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्ला गडावर जात तेथील विकासकामांचे भूमिपूजन केले. तर अजित पवार यांनी कान्हे येथे रुग्णालयाचे लोकार्पण करून भव्य सभेला संबोधित केले.
आमदार शेळकेंचे आक्रमक भाषण…
आमदार सुनिल शेळके यांनी कान्हे येथील सभेत अत्यंत आक्रमक अंदाजात भाषण केले. विरोधकांच्या टीकांना प्रत्युत्तर, चर्चांवर भाष्य करतानाच आमदार शेळकेंनी पाच वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा देखील मांडला. सोबत मावळसाठी मिळालेल्या विकासनिधी बद्दल राज्य सरकारचे आणि अजित पवार यांचे धन्यवाद देखील मानले.
मावळला तीन वर्षांत 4 हजार कोटी – पवार
मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार नव्हता. सुनिल शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. कोविड आणि विरोधी पक्षातील दिवस वगळता मागील तीन वर्षांत मावळसाठी 4 हजार कोटी राज्य सरकारने दिले आणि पीएमआरडीएचे 1 हजार कोटी असे एकूण 5 हजार कोटी निधी मावळसाठी उपलब्ध झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगावात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची सुरूवात । Talegaon Dabhade
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात येणार, कार्ला गडावर एकविरा देवीचे दर्शन घेणार । CM Eknath Shinde
– वंदन दुर्गांना । कुटुंबासह ती पेलतेय सामाजिक जबाबदारी : संविधान संस्कारासाठी झटणाऱ्या संविधान संवादक शितलताई । Shital Yashodhara