Dainik Maval News : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) लोणावळा शहरात ( Lonavala City ) पावसाचा जोर कायम असलेला दिसत आहे. तालुक्यातील अन्य शहरांत पावसाचा जोर ( Rain Updates ) काहीसा ओसरलेला असताना लोणावळ्यात मात्र पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येत आहे.
बुधवार, दिनांक 23 जुलै रोजी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहरात 24 तासांत 83 मि.मी. अर्थात 3.27 इंच इतका पाऊस झाला. तर 1 जून 2025 पासून आजमितीस एकूण 3130 पाऊस झाला आहे. गतवर्षी दिनांक 1 जून 2024 ते 23 जुलै 2024 दरम्यान एकूण 2326 मि.मी. इतका पाऊस झाला होता. याचा अर्थ यंदा पावसाचा जोर जून-जुलै महिन्यात अधिक असलेला दिसतो.
समाधानकारक पावसामुळे लोणावळा शहर आणि परिसरातील निसर्ग चांगलाच फुलला आहे. शहराजवळील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले भूशी धरण 14 जून रोजी ओव्हरफ्लो झाले आहे. तर शहराजवळील डोंगराळ भागातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत, यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वर्षा पर्यटनासाठी लोणावळा नगरीत दाखल होत आहेत. यामुळे स्थानिक लहान मोठे विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा