Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावात एका ८० वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. कोंडीबा गुणाजी असवले (वय ८० वर्षे) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा असवले हे गावातील विहिरीपाशी गेले असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. विहीर खोल असल्याने आणि पाणी जास्त असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्न करून कोंडीबा असवले यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.
वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि टाकवे गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला. या घटनेमुळे टाकवे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोनावळा, निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, विनय सावंत, कुंदन भोसले, रवि कोळी , राजेद्र बंडगे , दिनेश भालेकर
तेजस भागवत , पिंटु मानकर, आकाश ओव्हाळ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला. वडगाव पोलीस स्टेशन, पोलीस पाटील टाकवे अतुल असवले व ग्रामस्थ टाकवे उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
– लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर
– आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी
– भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं