व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबई–पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या लोणावळा शहराला पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर जागतिक ओळख मिळावी, या दृष्टीने विविध विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, ट्रॅफिक व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, फूटपाथ सुधारणा, भूमिगत विद्युतवाहिन्या, पथदिवे, पार्किंग झोन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, अतिक्रमण नियंत्रण, जंक्शन सुधारणा तसेच हॉकर्स झोन निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा आराखडा सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने CCTV द्वारे वाहतूक व सुरक्षा नियंत्रण अधिक प्रभावी करण्यावरही भर देण्यात आला.

याचबरोबर 2027 मध्ये होणाऱ्या “Pune Grand Tour Cycle Race” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग मावळ तालुक्यातून जाणार असून, जागतिक दर्जाचे खेळाडू लोणावळ्यात येणार असल्याने शहराच्या पर्यटन व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली.

या बैठकीत आमदार सुनील शेळके उपस्थित होते. लोणावळा शहराच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ आणि दूरदृष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शहरात नवीन प्रकल्प यावेत, उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी आमदार शेळके सातत्याने पुढाकार घेत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचेही दिसून आले.

बैठकीस लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने या विकास आराखड्यास सकारात्मक प्रतिसाद देत लोणावळा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. या सकारात्मक पुढाकाराबद्दल सर्व नगरसेवकांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांचे आभार व्यक्त करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

Next Post

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.