मुंबई – पुणे जुण्या महामार्गावर कान्हे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कान्हे फाटा जवळील साई सेवा धाम मंदिरासमोर हा अपघात झाला होता. बुधवार (29 नोव्हेंबर) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. ( Trailer Container Accident At Kanhe Phata On Mumbai Pune Old Highway One Died )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, कान्हेफाटा जवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या नादुरुस्त कंटेनरला भरधाव ट्रेलरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात चालक लक्ष्मीनारायण पटेल याचा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. पुढील तपास वडगाव पोलिसचे सुनील मगर करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ भाजपाचे नूतन कार्यालय तालुक्यात विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे ठरेल – माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे
– मोठी बातमी! राष्ट्रवादीचं तळेगाव MIDC बंद आंदोलन तात्पुरते स्थगित, ‘आश्वासनांच्या पुर्ततेसाठी सोमवारपर्यंत वाट पाहणार, नंतर…’