Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विधानसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. दिनांत 26 आणि 27 ऑक्टोबर असे दोन दिवस हे प्रशिक्षण सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण सत्र सुरु झाले असून यात एकूण 3103 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शनिवारी एकूण 1380 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. तर रविवारी 27 ऑक्टोबर 1723 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणकीय प्रणाली द्वारे हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच प्रत्येकी 50 प्रशिक्षणार्थींच्या बॅचमध्ये स्वतंत्र खोलीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
शनिवारी प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रशिक्षणार्थीना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी व कर्तव्ये सांगून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडावी अशा सूचना दिल्यात.
निवडणूक प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत असून पहिले प्रशिक्षण शनिवारी देण्यात आले. दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई